
Prithviraj Chavan: राज्याच्या राजकारणात आणि सामाजिक घडामोडींवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विविध मुद्द्यांवर आपले मत मांडले. हिंदी भाषा सक्तीचा वाद, शिक्षणाची सद्यस्थिती, राजकीय पक्षांचे एकत्रिकरण आणि विविध प्रकल्पांमधील कथित भ्रष्टाचार यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले.
मनसे आणि शिवसेनेच्या वतीने काढल्या जाणाऱ्या हिंदी भाषा सक्तीविरोधी मोर्चात काँग्रेसने सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे नेते ठरवतील, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.