शेतकरी प्रश्‍नांसंदर्भात राज्यपालांची भेट घेणार- चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

कऱ्हाड : वस्तू व सेवा करासंदर्भात ज्या प्रमाणे सरकारने तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले त्यानुसार राज्यातील शेतकऱयांच्या कर्ज माफी व त्यांच्या प्रश्‍नांसंदर्भात विशेष अधिवेशन बोलवावे या मागणीसाठी राज्यातील विरोधी पक्षांच्या आमदारांचे शिष्टमंडळ दोन मे रोजी राज्यपालांची भेट घेणार आहेत, अशी माहिती संघर्ष यात्रेदरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (गुरुवार) येथे दिली.

शेतकरी कर्जामाफीसह तूर प्रश्नी विरोधक आक्रमक झाले आहेत. एक मे रोजी राज्यातील जिल्हा व तालुकास्तरावर ध्वजवंदनानंतर विरोधी पक्षांचे आमदारांकडून संबंधित जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदारांना दहा किलो तूर भेट देवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यारांना वाचवा, तूर विकत घ्या असे शासनाकडे आवाहन करणार आहेत, असे श्री. चव्हाण व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी तूर लावली आहे. त्यामुळे सरकारने तूर खरेदी प्राधान्य द्यावे. असे आवाहन केले. यावेळी आमदार पतंगराव कदम, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी, जोगेंद्र कवाडे, आमदार जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prithviraj chavan statement on farmer issue