Ethanol RS Rate : खासगी बाजारातील इथेनॉल, आरएसचे दर घसरले; नव्या डिस्टिलरी तोट्यात

अतिरिक्त उत्पादनामुळे इथेनॉलसह रेक्टीफाईड स्पिरीट (आरएस), एक्स्ट्रान्युट्रल अल्कोहोल (ईएनए) अशा सर्वच उत्पादनांच्या किमती नीचांकी पातळीवर आल्या.
ethanol

ethanol

sakal

Updated on

सोमेश्वरनगर - केंद्र सरकारने ई-२० धोरणानुसार इथेनॉलच्या उत्पादनाची खरेदी घटविल्यामुळे पेट्रोल कंपन्या इथेनॉलचा मोजकाच कोटा खरेदी करत आहेत. त्यामुळे कारखान्यांनी उर्वरित इथेनॉल खासगी बाजारात उतरविले आणि खासगी कंपन्यांची अक्षरशः चांदी झाली.

अतिरिक्त उत्पादनामुळे इथेनॉलसह रेक्टीफाईड स्पिरीट (आरएस), एक्स्ट्रान्युट्रल अल्कोहोल (ईएनए) अशा सर्वच उत्पादनांच्या किमती नीचांकी पातळीवर आल्या आहेत. परिणामी चालू हंगामात जुन्या डिस्टिलरींच्या नफ्यात प्रचंड घट होणार आहे, तर नव्याने उभारलेल्या किंवा वाढविलेल्या डिस्टिलरी कर्जबाजारी होणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com