ऊसतोड कामगारांच्या शिक्षणाची समस्या आंतरराष्ट्रीय पातळीवर

‘प्रश्न’ लघुपटाला युनिसेफचे पारितोषिक; इटलीमध्ये पार पडला सन्मान सोहळा
ऊसतोड कामगारांच्या शिक्षणाची समस्या आंतरराष्ट्रीय पातळीवर
ऊसतोड कामगारांच्या शिक्षणाची समस्या आंतरराष्ट्रीय पातळीवरsakal

पुणे ः स्थलांतरामुळे मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांची मुले दीर्घ काळ शिक्षणापासून वंचित राहतात. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातही कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची समस्या अजूनही सुटलेली नाही. शिक्षणाचा हा प्रश्न संवेदनशीलपद्धतीने मांडणाऱ्या ‘प्रश्न’ या लघुपटाला युनिसेफच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे.

‘प्रश्न’ या लघुपटात हंगामी ऊसतोड कामगार गंगा आणि राजकुमार स्थलांतरित होतात, त्यामुळे त्यांचा मुलगा गणेश याला शालेय शिक्षण कठीण होते. आर्थिक आणि जातीय वास्तव असूनही त्यांना यामध्ये मार्ग सापडतो. ग्रामीण भागातील शाळांची परिस्थिती, शिक्षकांवरील ताण, वेगवेगळ्या लोकांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या लघुपटात दिसतो. ऊसतोड कामगार असलेली आणि प्राथमिक शिक्षणही पूर्ण न केलेली आई आपल्या मुलाला शिकवण्यासाठी वाचनाची क्लृप्ती कशी वापरते हे या लघुपटात पाहायला मिळते.

ऊसतोड कामगारांच्या शिक्षणाची समस्या आंतरराष्ट्रीय पातळीवर
Good news: MPSC परीक्षेला बसण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ

इटली येथील फ्लोरेन्स शहरात नुकतेच पार पडलेल्या युनिसेफ इनोसेंटी फिल्म फेस्टिव्हल २०२१ मध्ये हा गौरव करण्यात आला होता. आयरिस पुरस्कार विशेष उल्लेख (लेखन) या प्रकारात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रश्न या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन संतोष राम, तर निर्मिती डॉ. गणेश आणि दिपाली सानप या दांपत्याने सामाजिक जाणिवेतून केली आहे. या चित्रपटमहोत्सवातून लहान मुलांच्या बालपणावर आधारित चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन दिले जाते. लहान मुलांच्या चित्रपट निर्मितीतील उत्कृष्टतेचे परिमाण म्हणून या महोत्सवाकडे पाहिले जाते. महोत्सवाच्या दुसऱ्या आवृत्तीत ११४ देशांमधून एक हजार ७०० चित्रपटांनी सहभाग घेतला होता. त्यातील ३८ चित्रपटांचा समावेश महोत्सवात करण्यात आला होता. भारतातून पुरस्कार प्राप्त एकमेव मराठी लघुपट आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com