esakal | ज्येष्ठता व गुणवत्तेनुसार राज्याच्या शिक्षण विभागातील 16 अधिकाऱ्यांना प्रमोशन ! 
sakal

बोलून बातमी शोधा

officer

राज्याच्या शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी व तत्सम पदांवर कार्यरत असणाऱ्या 16 अधिकाऱ्यांना शिक्षण उपसंचालक व समकक्ष, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट - अ या पदावर पदोन्नती मिळाली आहे. ज्येष्ठता व गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गात रिक्त असलेल्या 16 पदांवर अटींच्या अधीन राहून तात्पुरती पदोन्नती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव दीपक शेलार यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. 

ज्येष्ठता व गुणवत्तेनुसार राज्याच्या शिक्षण विभागातील 16 अधिकाऱ्यांना प्रमोशन ! 

sakal_logo
By
प्रदीप बोरावके

माळीनगर (सोलापूर) : राज्याच्या शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी व तत्सम पदांवर कार्यरत असणाऱ्या 16 अधिकाऱ्यांना शिक्षण उपसंचालक व समकक्ष, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट - अ या पदावर पदोन्नती मिळाली आहे. 

ज्येष्ठता व गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गात रिक्त असलेल्या 16 पदांवर अटींच्या अधीन राहून तात्पुरती पदोन्नती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव दीपक शेलार यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. 

अधिकाऱ्यांचे नाव व कंसात पदोन्नतीच्या पदावरील आस्थापना 
औदुंबर संपतराव उकिरडे (विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे), सुधाकर माधवराव तेलंग (विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूर), सुभाष रमेश बोरसे (विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई), हारुण इस्माईल आत्तार (उप आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ, पुणे), वंदना वाहूळ (शिक्षण उपसंचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, पुणे), राजेश गोपीनाथ क्षीरसागर (शिक्षण उपसंचालक, अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय, पुणे), अर्चना अरविंद कुलकर्णी (विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ, पुणे), संदीप प्रमोद संगवे (विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई), राजेंद्र माणिक अहिरे (विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ, नाशिक), वैशाली जगन्नाथ जमादार (विभागीय शिक्षण उपसंचालक, नागपूर), श्रीराम महादू पानझाडे (उपसंचालक आस्थापना, शिक्षण आयुक्तालय, पुणे), शैलजा रामचंद्र दराडे (उपआयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ, पुणे), अनिल संपतराव साबळे (विभागीय शिक्षण उपसंचालक, औरंगाबाद), रमाकांत महादेव काठमोरे (शिक्षण उपसंचालक, महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, औरंगाबाद), गणपत शंकर मोरे (विभागीय शिक्षण उपसंचालक, लातूर), शिवलिंग नामदेव पटवे (विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोकण - 1). 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image