नुपूर शर्मांविरोधात औरंगाबाद, सोलापुरसह देशभर जोरदार निदर्शने

protest in all over country delhi mumbai aurangabad solapur over controversial remarks on prophet muhammad
protest in all over country delhi mumbai aurangabad solapur over controversial remarks on prophet muhammad

नवी दिल्ली : पैगंबर हजरत मोहम्मद यांच्याबदद्ल नूपुर शर्मा व नवीन जिंदल या माजी भाजप प्रवक्त्यांनी केलेल्या अपमानास्पद उद्गारांच्या निषेधार्थ व त्यांना अटक करावी या मागणीसाठी दिल्ली, मुंबई, सोलापूर, औरंगाबाद, लखनौ, मुरादाबाद, रामपूर, हैदराबादसह देशाच्या अनेक शहरांत आज (शुक्रवारी) हजारोंच्या संतप्त निदर्शनांचा अक्षरशः वणवा पेटला. दुपारी १ ते २ या काळात भडकलेली निदर्शनांची धग देशभरात वाढत चालली आहे.

शुक्रवारची जुम्मा नमाज अदा केल्यावर शर्मा व जिंदाल यांना त्वरित अटक करावी या मागणीसाठी ठिकठिकाणी संतप्त जमावाने निदर्शने केली. नवी मुंबई भागात शर्मा यांच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चात मुस्लिम तरुणांबरोबर महिलांचाही लक्षणीय सहभाग होता. सहारनपूर, प्रयागराज व देवबंद येथे उग्र जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. कोलकत्या जवळील हावडा येथे जाळपोळ झाली. दरम्यान दिल्लीतील ऐतिहासिक जामा मशिदीच्या बाहेरही हजारो संतप्त तरूण व महिलांनी जोरदार निदर्शने करण्यात आली मात्र दिल्लीत दुपारच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. ‘‘जामा मशिदी बाहेरच्या निदर्शनांना मशिदीच्या व्यवस्थापनाचा काहीही संबंध नव्हता, हे कदाचित (असदुद्दीन) ओवैसी यांचे लोक असतील'‘ अशा शब्दांत शाही इमाम अहमद बुखारी यांनी, या प्रकाराशी संबंध झटकून टाकला आहे. मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी, ही निदर्शने ही अपवाद वगळता लोकशाही पध्दतीने व उस्फूर्तपणे झाल्याचा दावा केला आहे.

दिल्लीच्या जामा मशिदीत जुम्मा ची नमाज अदा करण्यास हजारो भाविक येत असतात. आजची नमजा पार पडल्यावर मशिदीच्या क्र. १ च्या प्रवेशद्वारासमोर अचानक मोठ्या संख्येने लोक जमले व त्यांनी शर्मा व जिंदाल यांना अटक करा या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. दिल्ली पोलिसांच्याही विरोधात घोषमा देण्यात आल्या. शान-ए-नबी यांचा म्हणजे प्रेषितांचा अपमान पृथ्वीवरील कोणताही मुसलमान सहन करणार नाही असेही यातील अनेक तरूण ओडरून सांगत होते. काही मिनिटांतच पोलिस व अर्धसैनिक दलाच्या जवानांची मोठ्या संख्येने तैनाती या भागात झाली. पोलिसांनी निदर्शने करणाऱया लोकांशी संवाद साधला.या अराजक तत्वांविरूध्द कारवाई केली जाईल असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. काल याबाबत सोशल मिडीयावर एक निनावी मेसेज व्हायरल झाला होता. त्यात शर्मा, जिंदाल यांच्या अटकेसाठी भारत बंदचे व रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले गेले होते. त्याचे उगमस्थानही दिल्ली आहे का, याचीही दिलली पोलिस तपासणी करत आहेत. या भडकाऊ व्हायरल मेसेजचीही दिल्ली पोलिस बारकाईने चौकशी करत आहेत. मात्र या व्हायरल मेसेजवर कोणत्याही संघटनेचे नाव नव्हते.

भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात सोलापुरात मोठ्या संख्येने लोकांनी निषेध मोर्चा काढला.

protest in all over country delhi mumbai aurangabad solapur over controversial remarks on prophet muhammad
Monsoon: आनंदवार्ता! मॉन्सून कोकणात दाखल - IMD

जामा मशिदीच्या बाहेरील प्रदर्शनांबरोबर मशिदीचा काहीही संबंध नव्हता असे शाही इमाम अहमद बुखारी यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ पत्रकार व आज तकचे कार्यकारी संपादक सईद अंसारी यांनी सांगितले की, निदर्शने सुरू असतानाच आपण बुखारी यांना ‘या निदर्शनांची तुमचा काही संबंध आहे का ‘, असे विचारले तेव्हा त्यांनी स्पष्टपणे , याच्याशी जामा मसिदीच्या व्यवस्थापनाचा काडीचाही संबंध नसल्याचा दावा केला. मग हे लोक होते कोण व ते कोठून आले होते, या आपल्या प्रश्नावर बुखारी यांनी, ते कोण होते हे मला काय माहिती? त्यांनी काय घोषणा दिल्या हे मला काय माहिती? असे प्रतिप्रश्न केले असेही अंसारी म्हणाले.

दरम्यान बुखारी यांनी नंतर पत्रकारांशी बोलतानाही जामा मशीद समितीतर्फे आजच्या नमाजनंतर अशा प्रकारच्या निदर्शनांचे आवाहन केले गेले नव्हते असे स्पष्ट केले. ते म्हणाले की जेव्हा काल याबाबतचा एक मेसेज सोशल मिडीयावर आला तेव्हाच आम्ही संबंधितांना स्पष्ट केले होते की जामा मशीदीच्या वतीने जुम्मा नमाजानंतर निदर्शने करण्याचे कोणतेही आवाहन करण्यात आलेले नाही. तुम्हाला विरोध करायचा तर करा पण आमचा (जामा मशीद) तुम्हाला पाठिंबा नसेल असेही आपण कालच स्पष्ट केले होते. हे लोक कदाचित एआयएमआयएमचे किंवा ओवैसी यांचे लोक असावेत. उत्तर प्रदेशातील लखनौ, देवबंद, सहारनपुर तसेच कोलकाता, हैदराबाद येथएही मशिदींच्या बाहेर हजारो लोकांनी प्रदर्शन केले.

protest in all over country delhi mumbai aurangabad solapur over controversial remarks on prophet muhammad
हे शौकीन लोक मागवतात इंग्लडहून पिझ्झा, वाचा काय आहे प्रकरण

दिल्लीच्या जामा मशिदीच्या तीन प्रवेशद्वारांच्या बाहेर निदर्शनांनंतरच्या दोन तासांत परस्परविरोधी दृश्ये दिसली. दुपारी साडेचारच्या सुमारास जामा मशिदीच्या चारही दिशांच्या पायऱ्या गच्च भरून गेल्या होत्या. प्रवेशद्वार क्रमांक १ (दख्खन दरवाजा) च्या बाहेर तर प्रचंड संख्येने निदर्शक होते. मात्र त्याच वेळी जामा मशिदीच्या प्रवेशद्वार क्र. २, ३ च्या बाहेरील जुन्या दिल्लीच्या परिसरातील जनजीवन सामान्य झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com