मुंबई - ‘राज आणि उद्धव ठाकरे हे दोघे भाऊ आहेत. दोघे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. दोघे एकत्र येतील हा मला विश्वास आहे. इतरांनी कुणी कितीही काहीही केले तरी हे दोन्ही भाऊ एकत्र येतील.’ असा दावा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी शनिवारी केल्याने राज्याच्या राजकारणात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.