
नारायणगाव: येथील पुणे-नाशिक महामार्गावर मुक्ताई ढाब्याजवळ प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्झिमो व्हॅन व इतर दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात मॅक्झिमो व्हॅनच्या चालकासह नऊ जणांचा मृत्यू झाला असून सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या पैकी सहा जणांवर नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात तर एका गंभीर जखमीला पुणे येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये चार महिला, चार पुरुष व एक लहान मुलगा आहे. अपघात शुक्रवारी सकाळी पावणेदहा वाजता झाला. आशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्य पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.