Pune Bypoll Election : निवडणुकीच्या तोंडावर चिंचवडमध्ये सापडलं ४० लाखांचं घबाड

कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे
Pune Bypoll Election
Pune Bypoll Election

कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान, चिंचवड मतदारसंघातून मोठी माहिती समोर आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर चिंचवडमध्ये ४० लाखाचं घबाड सापडलं आहे.(Pune Bypoll Election 40 lakh cash found in car in Chinchwad )

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. अशातच चिंचवडमध्ये आज एका कारमध्ये तब्बल ४० लाखांची रोकड सापडली आहे. ही रोकड कुणाची आहे आणि कुणी आणली याचा तपास सुरू आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भात पिंपरी चिंचवड शहरात लागू करण्यात आलेल्या आचारसंहिता नियमानुसार चिंचवड क्षेत्रात ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जात असताना एका कारमध्ये ४० लाखाची रोकड तर दुसऱ्या एका कारमध्ये धारदार शस्त्र सापडली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील दळवी नगर परिसरात निवडणूक विभागाच्या अधिकारीकडून केल्या जाणाऱ्या तपासणीत एका कारमध्ये ४० लाख रुपयांची रोकड मिळाल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित रक्कम कुठे नेली जात होती. याची चौकशी सुरू आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी पोहोचले असून तपास सुरू आहे.

या दोन्ही प्रकरणांमध्ये निवडणूक अधिकारी आणि पोलीस यंत्रणा तपास करत असून नेमकी ही रोकड कुठे नेली जात होती आणि दुसऱ्या कारमध्ये आढळून आलेल्या हत्यारं कुणी वापरत होत या बाबत निवडणूक विभागाकडून प्रेस नोट द्वारे माहिती देण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी किरण गायकवाड यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com