Pune Crime : पार्ट टाईम जॉब अन् कमिशनच्या नादापायी महिलेला गंडवलं

Pune Crime News
Pune Crime News esakal

पुणेः कंपनीमध्ये पार्ट टाईम जॉब आणि भरघोस कमिशनचं आमिष दाखवून पुण्यातील महिलेची १९ लाखांना फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पार्ट टाईम जॉबमधून दिवसाला अडीच ते तीन हजार रुपये कमविण्याचे नादात तिघांनी मिळून महिलेची फसवणूक केली आहे. पुण्यातील मार्केटयार्डमध्ये राहणाऱ्या ३७ वर्षीय महिलेने या प्रकरणी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी रँडस्टॅन्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, चेन्नई या कंपनीचे मालक, www.kyktrips.com या कंपनी चे मालक तसेच मे. डिवाइन एंटरप्राइजेसचे मालक सुरेश भगोरा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

मिळालेल्या माहितीनुसार, यातील एका आरोपीने फिर्यादी महिलेला त्यांच्या मोबाईलवर पार्टटाईम जॉब करून दिवसाला २५०० ते ३००० रुपये कमावण्याचे आमिष दाखवले. नोकरीची गरज असल्यामुळे या अमिषाला ती महिला बळी पडली.

Pune Crime News
Pune Fire : स्वारगेट परिसरात दुकानांना भीषण आग; अग्निशमन दलाची सहा वाहनं घटनास्थळी

आरोपीने त्यानंतर महिलेला whataapp वर माहिती पाठवून kyktrips.com या वेबसाईटवर जाऊन सर्व माहिती भरायला सांगितली. आरोपींनी काम सुरू झाल्याचे सांगत फिर्यादी यांना टुर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स्चे रेटिंग आणि रिव्हू करण्याचे काम दिले. आरोपींच्या सांगण्यानुसार फिर्यादी यांनी ते काम पूर्ण केले टास्क पूर्ण केला.

दरम्यान, सुरेश भगोरा याने फिर्यादी यांना त्याच्या यूपीआय आयडीवर ५००० हजार भरायला सांगितले. फिर्यादींना कामामध्ये मोठी रक्कम मोबदला म्हणून मिळते आहे असे सांगत अनेक वेळा पैसे उकळले. आरोपींनी त्या महिलेकडून १९,५५,१७१ रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून त्यांच्या खात्यात पैसे जमा केले. एवढी मोठी रक्कम गेल्यामुळे महिलेने पोलिसात धाव घेतली.

या प्रकरणी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात भारतीय दंडात्मक पोलिस ठाण्यात ४१९, ४२० तसेच आय टी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com