पंढरपूरकडे जाणारा 65 लाखांचा गांजा पुणे 'कस्टम'ने तांदूळवाडीजवळ पकडला

1Crime_6_98.jpg
1Crime_6_98.jpg
Updated on

सोलापूर : आंध्र प्रदेशातील एका ठिकाणाहून सोलापूरमार्गे पुण्याकडे निघालेल्या वाहनातील (एम.एच. 13 सीयू 3192) तब्बल 65 लाख रुपयांचा गांजा पुण्यातील कस्टम विभागाच्या पथकाने पकडला.

ठळक बाबी...

  • आंध्र प्रदेशातील एका गावातून पंढरपुरकडे निघाला होता 65 लाखांचा गांजा
  • पुणे कस्टम अधिकाऱ्यांनी तांदूळवाडीजवळ (ता. दक्षिण सोलापूर) सुरु केली वाहनांची तपासणी
  • नळदूर्ग- सोलापूर रोडवरील संतोष ढाब्याजवळ एक वाहन थांबवून चालक झाला होता पसार
  • कस्टमच्या पाच सदस्यीय पथकाने वाहनाची कसून तपासणी केली
  • वाहनाच्या केबिनजवळील पोकळीत लपवून ठेवले होते गांजाचे सहा प्लास्टिक पॅकेट
  • पुणे कस्टमच्या सहआयुक्‍त वैशाली पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्‍त अलोक सिंग यांच्या पथकाची कारवाई

एका वाहनातून गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती पुणे सीमा शुल्क अधिकाऱ्यांना मिळाली. त्यावेळी पाच जणांचे पथक नळदूर्ग- सोलापूर रोडवरील संतोष ढाब्याजवळ पोहचले. दरम्यान, त्यावेळी आंध्र प्रदेशातून एका वाहनाच्या माध्यमातून हा गांजा वाहून नेला जात होता. सोलापूरहून पंढरपूरकडे तो गांजा घेऊन जात होते. सहायक आयुक्‍त अलोक सिंग यांच्या पथकाने त्या ठिकाणच्या तांदूळवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथे वाहनांची तपासणी सुरु केली. त्यावेळी ते वाहन 500 मीटर अंतरावर थांबले होते आणि वाहनचालक त्यातून पसार झाला होता. वाहनाची तपासणी करुनही सुरवातीला गांजा मिळाला नाही. त्यानंतर वाहनाच्या केबिनजवळील ताडपत्रीच्या पोकळीत पाहणी केली. त्यावेळी गांजाने भरलेले प्लास्टिकचे पॅकेट दिसून आले. कस्टम अधिकाऱ्यांनी वाहनासह 85 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पुणे कस्टमच्या सहआयुक्‍त वैशाली पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (ता. 4) दुपारी चारच्या सुमारास पार पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com