Pune Omicron Updates: पुण्यात ओमायक्रॉनचा कहर; एका दिवसात तब्बल १२५ रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Omicron

पुण्यात ओमायक्रॉनचा कहर; एका दिवसात तब्बल १२५ रुग्ण

पुणे :  आज राज्यात 125 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली. हे सर्व रुग्ण पुणे मनपा क्षेत्रातील आहेत. (Pune District Omicron Updates)

आजपर्यंत राज्यात एकूण 2199 ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत. यातील 26 रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी 1 रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. 7 रुग्ण ठाणे आणि 4 रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर 9 रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

हेही वाचा: 'फायझर'चे कोविड औषध घटक बायोफोर इंडिया कडून विकसित

आज सापडलेल्या बाधितांपैकी 87 रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था तर 38 रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा यांनी कळवले आहेत. एकूण रुग्णांपैकी 1144 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. आतापर्यंत 5530 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 96 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

Web Title: Pune District Omicron Update State

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune Newsomicron