Rain Alert: पुण्यासह 'या' जिल्ह्यांमध्ये मंगळवारी पावसाचा इशारा; राज्यात कुठे, कसं असेल हवामान?
मंगळवारी तळकोकण, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव व लातूर येथे हवामान विभागाने दक्षतेचा इशारा दिला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही मुसळधार पाऊस कोसळू शकतो.
पुणे : राज्यात पूर्वमोसमी पावसाचा धडाका सोमवारीही सुरुच राहिला. राज्याच्या विविध भागांमध्ये पूर्वमोसमी पावसाने तडाखा दिला. मंगळवारी (ता. २०) तळ कोकणासह मध्य महाराष्ट्रात जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज ऍलर्ट देण्यात आला आहे.