Fastag: गाडी पार्किंगमध्ये... टोल वसुली मात्र सुरुच; काय आहे प्रकार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fastag

Fastag: गाडी पार्किंगमध्ये... टोल वसुली मात्र सुरु; काय आहे प्रकार?

पुणेः तुमची गाडी एकाजागी उभी असेल आणि तुम्हाला फास्टटॅगद्वारे पैसे कापल्याचे मेसेज येत असतील तर? अशीच संताप आणणारी घटना पुण्यात घडली आहे. विशेष म्हणजे या कार मालकाची गाडी घराच्या पार्किंगमध्ये उभी होती.

पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्याच्याबाबत हा प्रकार घडला आहे. मनपाच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेले सुरेश परदेशी यांची गाडी पार्किंगमध्ये उभी असतांनाही त्यांच्यावर ही 'टोल'धाड पडलीय. सोलापूर रोडवरील तीन टोलनाक्यांवर टोल कापल्याचा हा प्रकार घडला.

''कुटुंबासोबत दिवाळी साजरी करीत असतांना माझी गाडी पु्ण्यातील घरात होती. २७ ऑक्टोबरला कार्यालयात आल्यावर मोबाईलवर पाटस टोल नाक्यावर ८५ रुपये टोल कटल्याचा मेसेज आला'' असं परदेशी यांनी सांगितलं.

"मी माझ्या पत्नीला गाडी चोरीला गेली आहे का म्हणून पार्किंगमध्ये बघायला सांगितलं. तिने गाडी पार्किंगमध्येच असल्याचे सांगितले. या दरम्यान सरडेवाडी टोलनाक्यावर ८५ रुपये कट झाल्याचा मेसेज आला. काही वेळाने पुन्हा वरवडे टोल नाक्यावरील ७० रुपयांची पावतीचा मेसेज मला आला. मी तात्काळ बँकेला सांगून माझे अकाउंट ब्लॉक करायला सांगितले."

परदेशी यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांना देखील याबाबत पत्र लिहले आहे.

टॅग्स :Pune NewsVehicle