Pune News : धक्कादायक! 'त्या' दहशतवाद्यांकडे सापडले बॉम्ब तयार करण्यासाठीचे रसायन, उपकरणे

pune Crime News
pune Crime News
Updated on

पुणे : कोथरूडमधून अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांकडून बॉम्ब तयार करण्याचे रसायन आणि प्रयोगशाळेतील उपकरणे जप्त केल्याची माहिती राज्य दहशतवादीविरोधी पथकाकडून (एटीएस) देण्यात आली.

pune Crime News
Eknath Shinde Video : देवेंद्र फडणवीस लोकप्रिय उपमुख्यमंत्री मग अजित पवारांचं काय? शिंदे बोलले तर चर्चा होणारच!

पुणे पोलिसांनी १८ जुलै रोजी महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान (वय २३) आणि महम्मद युसूफ महम्मद याकूब साकी (वय २४, दोघेही रा. चेतना गार्डन, मिठानगर, कोंढवा) या दहशतवाद्यांना अटक केली होती.

मध्यप्रदेशच्या रतलाममधील मूळ रहिवासी असलेले हे दोघे जयपूर बॉम्बस्फोट कटातील फरार आरोपी आहेत. ‘एटीएस’ने यापूर्वी त्यांच्या कोंढव्यातील घरातून ड्रोन, कुलाबा येथील छाबडा हाउससह इतर संवेदनशील स्थळांची छायाचित्रे आणि लॅपटॉमधून पाचशे जीबी डेटा हस्तगत केला होता.

pune Crime News
Local body polls : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबतची सुनावणी पुढे ढकलली; आता...

या प्रकरणात आतापर्यंत एकूण चारजणांना अटक केली आहे. त्यात या दोन दहशतवाद्यांसह त्यांना आश्रय देणाऱ्या अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय ३२, रा, कोंढवा) आणि आर्थिक रसद पुरविणाऱ्या सिमाब नसरुद्दीन काझी (वय २७, रा. कौसरबाग, कोंढवा) या दोघांचा समावेश आहे. या गुन्ह्यात इतर काहीजणांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. ‘एटीएस’च्या पथकांकडून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती ‘एटीएस’चे पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com