पुणेकरांनी १३ दिवसांत तब्बल आठ हजार पुस्तके व ग्रंथ केली दान

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 October 2020

वाचलेली पुस्तके आणि ग्रंथ दान करण्याच्या मोहिमेला पुणेकरांनी भक्कम पाठबळ दिले आहे. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये २२ सप्टेंबरला प्रसिद्ध झाल्यापासून आजतागायतच्या १३ दिवसांत सुमारे २०० पुणेकरांनी तब्बल आठ हजार पुस्तके व ग्रंथ या मोहिमेसाठी दान केली आहेत. यापैकी पाच हजार ग्रंथ हे मराठी भाषेतील असून सुस्थितीतील आहेत.

पुणेकरांकडून ८ हजार ग्रंथ दान  
राज्यातील ५० ग्रंथालयांना प्रत्येकी १०० पुस्तके देणार 
पुणे - वाचलेली पुस्तके आणि ग्रंथ दान करण्याच्या मोहिमेला पुणेकरांनी भक्कम पाठबळ दिले आहे. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये २२ सप्टेंबरला प्रसिद्ध झाल्यापासून आजतागायतच्या १३ दिवसांत सुमारे २०० पुणेकरांनी तब्बल आठ हजार पुस्तके व ग्रंथ या मोहिमेसाठी दान केली आहेत. यापैकी पाच हजार ग्रंथ हे मराठी भाषेतील असून सुस्थितीतील आहेत. उर्वरित तीन हजार ग्रंथ हे जीर्ण झालेले आणि इंग्रजी व गुजराती भाषेतील आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वाचन प्रेरणादिनापर्यंत (१५ ऑक्‍टोबर) ही मोहीम चालणार आहे. यात जमा झालेली सुस्थितीतील पुस्तके राज्यातील सुमारे ५० ग्रंथालयांना प्रत्येकी १०० पुस्तके भेट दिली जाणार आहेत. जीर्ण झालेली पुस्तके व ग्रंथ हे मुक्त वाचनालयांना देणार असल्याचे या चळवळीचे संस्थापक प्रवीण महाजन यांनी सांगितले. नंदुरबार येथील युवकमित्र परिवारातील युवकांतर्फे राज्यभर ही चळवळ राबविण्यात येत आहे. नागरिकांनी वाचून झालेले जुने, नवे ग्रंथ दान करावेत, असे आवाहन या चळवळीतील युवक पुणेकरांना करत आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाजन म्हणाले, ‘‘युवकमित्र परिवारातर्फे राज्यातील ग्रामीण भागात वाचनालये स्थापन केली जातात. या वाचनालयांना मोफत ग्रंथ भेट दिले जातात. यासाठी पुणे शहरात सेवा सप्ताह, दान सप्ताह, वाचन प्रेरणा दिनाच्या धर्तीवर ग्रंथ संकलन मोहीम राबविण्यात येते. नागरिकांनी दान केलेले जुने व नवे ग्रंथ ग्रामीण, दुर्गम भागातील वाचनालयांना प्रदान केले जाणार आहेत. आतापर्यंत २० ग्रंथालयांनी आमच्याकडे पुस्तकांची मागणी नोंदवली आहे.’’

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune residents donated over 8000 books and texts in 13 days