Rohit Pawar News: 'त्यात' वेगळं राजकारण असावं! ऋतुजा लटके प्रकरण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Pawar News

Rohit Pawar News: 'त्यात' वेगळं राजकारण असावं! ऋतुजा लटके प्रकरण...

Pune: ऋतुजा लटके यांनी पालिकेचा राजीनामा दिला परंतु त्यांना का सोडत नाहीत, हे माहिती नाही. यात वेगळं राजकारण असावं. कारण लोकांनी अनेक गोष्टी मागील काही दिवसांपासून बघितलेल्या आहेत. सध्या नेत्यांचाही आवाज दाबला जातोय, असा आरोप आ. रोहित पवार यांनी केलाय.

अंधूरी पूर्व विधानसभा निवडणूक, पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे प्रश्न, चंद्रकांत पाटील या वेगवेगळ्या विषयांवर रोहित पवार बोलत होते.

'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या फी वाढीचा विषय अजित पवार यांना सांगितला आहे. अशा पद्धतीने फी वाढ करणे चुकीचे आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत हा विषय आम्ही नेणार आहोत. तीन हजार असणारी फी आठ हजार झाली आहे. मुळात भाजपची काम करण्याची पद्धत म्हणजे ते यादी बघून काम करतात, विद्यार्थ्यांच्या परिस्थितीशी त्यांना देणंघेणं नसतं. पूर्वी हे विद्यापीठ कितव्या क्रमांकावर होतं आणि आज कितव्या क्रमांकावर आहे? ही गंभीर बाब आहे.' असं सांगून त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न सरकारदरबारी मांडणार असल्याचं सांगितलं.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरुन बोलतांना पवार म्हणाले की, आज नेत्यांचा आवाज दाबला जातोय. उद्या सामान्यांचाही दाबला जाईल. लोकांनी अनेक गोष्टी गेल्या काही दिवसांपासून बघितल्या आहेत. त्यामुळे ऋतुजा लटके प्रकरणात वेगळं राजकारण असावं, असा संशय रोहित पवारांनी व्यक्त केला.