
पुणे : ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या योजनेअंतर्गत पुणे विभागामध्ये पाच हजार ६४७ घरांसाठी म्हाडा यांच्यामार्फत गुरुवारी सोडत काढली. यावेळी उपमुख्यमंत्री कार्यालयामधील समिती सभागृहामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी या सदनिकांसाठी अर्ज नोंदणीचा प्रारंभ झाला आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास उपस्थित होते. यासाठी ११ डिसेंबर ते ११ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज नोंदणी करता येईल. तसेच यासाठी १२ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेमधून पुणे जिल्हयातील म्हाळूंगे येथील चाकणमधील ५१४, तळेगांव दाभाडेमधील २९६, सोलापूर जिल्हयातील गट नं.२३८/१,२३९ करमाळा येथे ७७ तर सांगली येथे स.क्र.२१५/३ येथे ७४ सदनिका अशा एकूण ९६१ सदनिकांसाठी अर्ज भरता येणार आहे. तसेच म्हाडा अंतर्गत पुणे येथील मोरवाडी पिंपरी येथे ८७, पिंपरी वाघेरे येथे ९९२ अशा एकूण १०७९ सदनिका आहेत. तसेच सांगली येथे १२९ सदनिका आहेत.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजतेंअंतर्गत पुणे जिल्हयामधील महाळुंगे येथे १८८०, दिवे मधील १४ तर सासवडमधील ०४ सदनिका आहेत. तसेच सोलापूर जिल्हयात ८२ सदनिका आहेत. असे एकूण १९८० सदनिका आहेत. २० टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत पुणे महानगरपालिका येथे ४१०, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे १०२० तर कोल्हापूर महानगरपालिका येथे ६८ असे एकूण १४९८ सदनिका आहेत. हे सर्व घरे अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठी उपलब्ध आहेत.
या संकेतस्थळावर नोंदणी करावी
यासाठी इच्छुकांनी १० डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून ते ११ जानेवारी २०२१ रोजी रात्री ११. ५९ वाजेपर्यंत https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी म्हाडाकडून सांगितले आहे.
या आहेत म्हाडा लॉटरी २०२० च्या तारखा
- १० डिसेंबर २०२० रोजी दुपारी अडीच वाजता नोंदणी आणि सायंकाळी सहा वाजता ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे.
- यासाठी नोंदणीची अंतिम तारीख ११ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी पाच वाजता संपणार आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ जानेवारी २०२१ रोजी रात्री ११.५९ वाजता संपणार आहे.
- ऑनलाईन देयकाची अंतिम तारीख १३ जानेवारी २०२१ रोजी रात्री ११.५९ वाजता संपणार आहे.
- आरटीजीएस / एनईएफटीसाठी शेवटची तारीख १३ जानेवारी २०२१ रोजी संबंधित बँकेच्या कार्यकाळापर्यंत समाप्त होणार आहे.
- स्वीकारलेल्या अर्जांची मसुदा यादी १८ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी सहा वाजता प्रकाशित केली जाणार आहे.
- स्वीकारलेल्या अर्जांची अंतिम यादी २० जानेवारी २०२१ रोजी दुपारी बारा वाजता प्रकाशित करण्यातयेणार आहे.
- अंतिम विजेत्या अर्जदारांची नावे २२ जानेवारी २०२१ रोजी म्हाडाच्या साईटवर प्रकाशित करण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.