Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात यांचं आम्ही भाजपमध्ये स्वागत करु; पण... मोठ्या नेत्याचं विधान

Sudhir mungantiwar on Balasaheb Thorat
Sudhir mungantiwar on Balasaheb Thorat

पुणेः काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेतील गटनेते पदाचा काल राजीनामा दिला होता. या राजीनाम्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. आता थोरातांचं पुढचं पाऊल काय? यासंदर्भात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला आहे. काँग्रेसने सत्यजीत तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांना पदवीधर मतदारसंघासाठी एबी फॉर्म दिला होता. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्याऐवजी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि ते निवडून आले.

Sudhir mungantiwar on Balasaheb Thorat
Shiv Sena : शिवसेना एकट्या उद्धव ठाकरेंची नाही, त्यांच्या दोन भावाचीही आहे; भाजप नेत्याचं मोठं विधान

सत्यजीत तांबे यांना बाळासाहेब थोरात यांनी सहकार्य केल्याचं बोललं जात आहे. निवडून आल्यानंतर सत्यजीत तांबे यांनी थेट काँग्रेस पक्ष आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर परवा झालेल्या एका कार्यक्रमात बाळासाहेब थोरात यांनी पक्षाचा विचार हाच आपला विचार असल्याचं म्हटलं होतं.

Sudhir mungantiwar on Balasaheb Thorat
Narendra Modi : 'तुम्ही कितीही वाढवा दाढी.. लै मजबुत मोदींची बॉडी' अन् सभागृहात एकच हशा पिकला

आज भाजप नेते सुधीर मुंनगंटीवार यांनी बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल एक विधान केलं आहे. ते म्हणाले की, मला वाटतं नाही की बाळासाहेब थोरात भाजपचा झेंडा हाती घेतली. पण तसं झालं तर आम्ही त्यांचे स्वागत करू. मामा-भाचे आमच्या पक्षात आले तर उत्तमच आहे, असं थोरात म्हणाले.

मंत्री सुधीर मुनगंटीवार हे आज बारामती दौऱ्यावर होते. त्यानंतर बोलतांना ते म्हणाले की, बारामतीमध्ये आज गेलो होतो. कुठल्याही निवडणुकीला सामोरे जायचं असेल तर काम गरजेचं असतं. बारामतीच्या कार्यकर्त्यांना तेच सांगितले. बारामतीमध्ये जे चांगलं आहे त्याचं अनुकरण केलच पाहिजे. विधान परिषदेमध्ये पराभव झाला त्याचं विश्लेषण करत आहे. कुठे चुकलं त्याच विश्लेषण करू. नियोजनात त्रुटी राहिली असल्याची शक्यता असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com