ajit pawar
ajit pawarSakal

Ajit Pawar : पुणे मॉडेल स्कूल राज्यभर राबविणार

जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांमधून चांगले शिक्षण मिळत असून, त्‍यात सातत्‍य टिकले पाहिजे.
Published on

पुणे - ‘जिल्हा परिषदेच्या शाळांना नवे रूप देण्यासाठी ग्रामपंचायती आणि सरपंचांनी पुढे येऊन शाळेच्या वाटचालीत सक्रिय सहभाग घ्यावा. पुणे मॉडेल स्कूल आणि मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रम राज्यात राबविण्यात येईल,’ अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केली. जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांमधून चांगले शिक्षण मिळत असून, त्‍यात सातत्‍य टिकले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com