
नवनाथ खराडे
अहिल्यानगर : कुस्तीक्षेत्रात अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ६७ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला. गादीवर झालेल्या अंतिम सामन्यात २-१ गुणांच्या आधारावर पृथ्वीराजने सोलापूर जिल्ह्यातील महेंद्र गायकवाड याच्यावर विजय मिळवत महाराष्ट्र केसरी किताबाचा मान पटकाविला. महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी ठरला. विजेत्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा आणि चारचाकी गाडीची किल्ली प्रदान करण्यात आली.