Maharashtra Politics : CM शिंदे - प्रताप सरनाईकांमध्ये जोरदार भांडणं; भाजपा ठरलं कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pratap Sarnaik EKnath SHinde
Maharashtra Politics : CM शिंदे - प्रताप सरनाईकांमध्ये जोरदार भांडणं; भाजपा ठरलं कारण

Maharashtra Politics : CM शिंदे - प्रताप सरनाईकांमध्ये जोरदार भांडणं; भाजपा ठरलं कारण

शिंदे गटाचं सरकार येऊन आता जवळपास तीन महिने झाले आहेत. दरम्यान, मंत्रीपदावरुनची धुसफूस, पालकमंत्री पदाबद्दलची नाराजी, अशा सगळ्या नाराजीनाट्यानंतर आता एक नवं प्रकरण समोर येतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातले आमदार प्रताप सरनाईक यांच्यात जोरदार भांडणं झाल्याची माहिती हाती येत आहे.

हेही वाचा: Amit Shah : 'बाप बाप होता है!' भर मांडवात जय शाहांना झापलं; व्हिडीओ व्हायरल

भाजपाच्या एका माजी आमदारासाठी प्रताप सरनाईक यांनी ओवळा माजीवाडा मतदारसंघ सोडावा, यासाठी एकनाथ शिंदेंकडून त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याची माहिती सामच्या सूत्रांनी दिली आहे. त्यातून या दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झालं आहे. या दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा: Maharashtra Politics : रश्मी ठाकरेंमुळे शिंदे - ठाकरे गट भिडणार? ठाणे दौऱ्याबद्दलची भीती

दरम्यान, प्रताप सरनाईक यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक याने एक ट्विट केलं आहे. दो दिल एक जान है हम असं म्हणत त्यांनी आपल्यात सगळं काही व्यवस्थित असल्याचं दाखवलं आहे. शिवाय आज होत असलेल्या एका कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस स्टेजवर उपस्थित असताना शिंदेंनी गर्दीत बसलेल्या सरनाईकांना स्टेजवर बोलावलं आणि आपल्यात सगळं काही ठीक असल्याचं दाखवून दिलं.