अहिल्यानगर - रब्बीत ज्वारीचे क्षेत्र वाढावे यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून यंदाही राज्यात पीक पद्धतीवर आधारित मूग, उडदानंतर ज्वारीच्या पेरणीसाठी ३२०० हेक्टरवर प्रात्यक्षिके घेतली जाणार आहेत. .राज्यात रब्बी हंगामाला लवकरच सुरुवात होत आहे. रब्बीत ज्वारी, गहू आणि हरभरा हे प्रमुख पिके आहेत. त्यामुळे ज्वारीसह गहू, हरभऱ्याच्या क्षेत्र वाढीसाठी पीक पद्धतीवर आधारित मूग, उडीद पिकानंतर ज्वारी, भात, बाजरीनंतर पिकानंतर हरभरा, मूग, उडदानंतर गहू पिकांची अधिक पेरणी व्हावी यासाठी ९ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिके घेतली जाणार आहे.बियाणे, निविष्ठा पुरवठा आदी बाबींवर पीक पद्धतीवर आधारित प्रात्यक्षिकांत एकूण हेक्टरी १५ हजारांचा खर्च असून खरिपात ९ हजार, तर रब्बीत ६ हजार रुपये खर्च आहे..रब्बीतील ज्वारी हे प्रमुख पीक आहे. अहिल्यानगर, सोलापूर, लातूर, बीड, उस्मानाबादसह विदर्भातील काही जिल्ह्यांत ज्वारी पीक घेतले जाते. राज्यात ज्वारीचे १७ लाख ५३ हजार ११८ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे.मात्र गेल्या काही वर्षांपासून बाजारात मागणी असूनही ज्वारीच्या क्षेत्रात घट होत आहे. वीस वर्षांतील ज्वारी उत्पादनाचा विचार केला तर क्षेत्रात ५० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. २०१०-११ मध्ये रब्बी ज्वारीची ३० लाख २८ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. त्या तुलनेत एकूण क्षेत्रात पन्नास टक्क्यांच्या जवळपास घट होत आहे..यंदा क्षेत्रात घट होऊ नये म्हणून प्रात्यक्षिकांतून ज्वारी क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे यंदा मूग, उडदानंतर शेतकऱ्यांनी इतर पिके घेण्याऐवजी ज्वारी घ्यावी म्हणून पीक पद्धतीवर आधारित ३,२०० हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिके घेतली जाणार आहेत. पाणी उपलब्धतता आणि मागणीही चांगली असल्याने यंदाच्या हंगामात राज्यामध्ये ज्वारीचे क्षेत्र वाढण्याची आशा आहे.....अशी आहेत प्रात्यक्षिके (हेक्टर)मुगानंतर रब्बी ज्वारी - १६००मुगानंतर गहू - ९००उडदानंतर रब्बी ज्वारी - १६००उडदानंतर गहू - १६००भातानंतर हरभरा - २३००बाजरीनंतर हरभरा - १९००.विभागनिहाय एकूण प्रात्यक्षिकेनाशिक - १५६०ठाणे - ७००पुणे - २३००कोल्हापूर - ८१०संभाजीनगर - ११००लातुर - १५३०अमरावती - १०००नागपूर - ८३०.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.