Rahul Gandhi: 'तुमचा नोकर...सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेलं पत्र फडणवीसांनी वाचावं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

congress Rahul Gandhi

Rahul Gandhi: 'तुमचा नोकर...सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेलं पत्र फडणवीसांनी वाचावं

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने राजकारण तापलं आहे. यानंतर राहुल गांधी यांनी अकोला येथे पत्रकार परिषद घेत यासंदर्भात खुलासा केला. पत्राचा दाखला देत राहुल गांधी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केलं.(Rahul Gandhi clarified on his controversial statement against Savarkar)

'सर मी तुमचा नोकर राहू इच्छित आहे, असं सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं, असं राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. सावरकरांनी इंग्रजांना मदत केली, याबाबत मी स्पष्ट आहे, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं.

तसेच, राहुल गांधी यांनी देवेंद्र फडणवीसांनीही हे पत्र पाहावे. सावरकरांनी इंग्रजांची मदत केली होती. तुम्हाला भारत जोडो यात्रा थांबवायची असेल तर थांबवा. सरकारला वाटत असेल तर त्यांनी भारत जोडो यात्रा थांबवून दाखवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनदेखील केलं आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

"एकीकडे देशासाठी अवघ्या २४ व्या वर्षी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत, ज्यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली. अंदमान तुरुंगातील शिक्षा कमी करण्यासाठी त्यांनी अनेकवेळा माफीची पत्रे इंग्रज सरकारला लिहिली," अशी टीका खासदार राहुल गांधी यांनी केली होती.