Ganpati 3D Rangoli : गणपती पावला! राहुल कळंबटेंनी साकारली जगातली सर्वांत लहान 3D रांगोळी; केला आगळावेगळा 'विश्वविक्रम'

राहुलला आजच ई-मेलद्वारे याची माहिती देण्यात आली.
Rahul Kalambate World Record in Ganpati 3D Rangoli
Rahul Kalambate World Record in Ganpati 3D Rangoliesakal
Summary

गणेशोत्सवाच्या काळातच इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डने थ्रीडी रांगोळी काढण्यास मान्यता दिली.

रत्नागिरी : रत्नागिरीतील (Ratnagiri) प्रसिद्ध रांगोळीकार राहुल कळंबटे (Rahul Kalambate) यांनी रांगोळीत आगळावेगळा विश्वविक्रम केला आहे. फक्त ६ सेंटिमीटरची गणपतीची थ्रीडी रांगोळी (Ganpati 3D Rangoli) त्यांनी साकारली असून ती जगातली सर्वांत लहान थ्रीडी रांगोळी म्हणून मान्यता मिळाली आहे.

Rahul Kalambate World Record in Ganpati 3D Rangoli
Kolhapur Ganeshotsav : बाळूमामापासून ते चांद्रयानपर्यंत..; कोल्हापुरात तांत्रिक देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी; कोठे काय पहाल?

इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डसने (International Book of Records) त्याच्या रांगोळीवर वर्ल्ड रेकॉर्डस् ऑफ एक्सलन्स अशी मोहर उमटवली आहे. राहुलला आजच ई-मेलद्वारे याची माहिती देण्यात आली. यापूर्वी राष्ट्रीय, राज्य व जिल्हा पातळीवर अनेक प्रकारच्या रांगोळी स्पर्धांमध्ये स्पृहणीय यश मिळवणाऱ्या राहुलला विश्वविक्रम करायचा होता. याकरिता तो माहिती घेत होता.

Rahul Kalambate World Record in Ganpati 3D Rangoli
मोठी बातमी! आता राज्य सरकार ग्रामपंचायतींना देणार दारू विक्रीच्या परवान्याचे अधिकार; प्रत्येक गावांत उघडणार दारूचे दुकान?

इंटनरॅशनल बुक ऑफ रेकॉर्डला त्याने संपर्क साधला व जगातली सर्वांत लहान थ्रीडी रांगोळी काढायचे ठरवले. रविवारी (ता. २४) १ तास १६ मिनिटांमध्ये गणपतीची थ्रीडी रांगोळी त्याने साकारून विश्वविक्रम केला आहे.

यासंदर्भात त्याच्याशी संपर्क साधला असता राहुल म्हणाला की, बऱ्याच दिवसांपूर्वी गणपतीपुळ्यात जाऊन गणेशमूर्ती आणली होती. गणेशोत्सवाच्या काळातच इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डने थ्रीडी रांगोळी काढण्यास मान्यता दिली व याच गणपती मूर्तीची थ्रीडी पांढऱ्या टाईल्सवर रांगोळी साकारून विक्रम केला. या रांगोळीकरिता रांगोळीचे रंग वापरले आहेत. या विक्रमाकरिता संबंधित संस्थेला वेळ, ठिकाण कळवावे लागते. अर्ज प्रक्रिया पूर्तता करावी लागते. या सर्व पूर्तता त्याने केल्या.

Rahul Kalambate World Record in Ganpati 3D Rangoli
Kolhapur : एकमेकांना संपवण्यासाठी इरेला पेटलेले मुन्ना-बंटी पुन्हा एकत्र येणार? महाडिकांच्या 'त्या' वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण

त्यानंतर आज इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डकडून अधिकृत ई-मेलद्वारे विश्वविक्रमाचे राहुल कळंबटे याला कळवण्यात आले. त्याला याआधी राज्यस्तरीय प्रथम, जिल्हास्तरीय प्रथम, राष्ट्रीय स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीसे मिळाली आहेत. गेली सात-आठ वर्षे रांगोळी कलाकार म्हणून कार्यरत आहे. सध्या सेंट थॉमस स्कूलमध्ये कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com