Rahul Shewale: माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेला शिवसेनेसह राष्ट्रवादीची फूस; राहुल शेवाळेंनी दिले स्पष्टीकरण

दिशा सालियन प्रकरण पुन्हा उकरून काढल्यामुळं शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे शिवसेनेच्या रडारवर आले आहेत.
Rahul Shewale
Rahul Shewaleesakal

दिशा सालियन प्रकरण पुन्हा उकरून काढल्यामुळं शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे शिवसेनेच्या रडारवर आले आहेत. शेवाळे यांच्या विरोधात एका महिलेनं केलेल्या लैंगिक अत्याचार व मानसिक छळाच्या तक्रारीची दखल घ्यावी व या प्रकरणाची पोलिसांकडून सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेनेनं केली. शिवसेनेच्या या मागणीनंतर राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत. या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. माझा संसार आणि राजकीय आयुष्य खराब करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणत त्या महिलेचे पाकिस्तानाशी संबध असल्याचा खळबळजनक दावाही शेवाळे यांनी केला. (Rahul Shewale press conference ShivSena Pakistan Dawood Ibrahim Uddhav Thackeray)

काय म्हणाले शेवाळे?

माझा संसार आणि राजकीय आयुष्य खराब करण्याचा प्रयत्न आहे. आरोप करणारी महिला स्वतः बार डान्सर आहे. माझ्यावर जिने आरोप केले ती दिल्लीत कॅब्रे डान्सर आहे. त्यांचे कुटूंब गुन्हेगारी पार्श्वभूमिचे आहे. मला पैशासाठी ब्लॅकमेल करण्यात आलं. माझ्यावरील सर्व आरोप हे खोटे. व्हायरल करण्यात आलेले सर्व फोटो व्हिडीओ खोटे आहेत.

आरोप करण्यात आलेल्या महिलेला मी मदत केली. मदत थांबवल्यानंतर तिनं मला ब्लॅकमेल केले. ती दुबईहून मला ब्लॅकमेल करायची. मला आणि माझ्या पत्नीला धमकी देण्यात आली. माझ्या उत्तरला दिल्ली पोलिसांनी दुजोरा दिला. आरोप करणारी महिला ८२ दिवसा जेलमध्ये होती. त्या महिलेला दुबई पोलिसांनी अटक केली. व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये मी नाही.

कोरोनाकाळा माणुसकीच्या नात्याने मी महिलेला मदत केली. या प्रकरणाचा मोठ्या राष्ट्रवादी नेत्याचा हात आहे. त्या महिलेचे पाकिस्तानशी संबध आहेत. असा खळबजनक दावाही शेवाळे यांनी केला आहे. तसेच, दाऊदच्या हस्तकांशीही महिलेचा संबध आहे. महिलेविरोधात माझ्याकडे अनेक पुरावे आहेत. शिवसेना सोडल्यामुळे माझी बदनाही सुरू आहे. यासर्वाची चौकशी एनआयएकडून व्हावी अशी मागणीही शेवाळे यांनी केली.

तिला ट्विटरवर युवासेना फॉलो करत होती. माझ्यावर आरोप कर म्हणून सांगायचे. पाकिस्तानी एजंटच्या मदतीने तिने फेक अकाऊंट चालवलं. महिलेल्या ठाकरे गटाच्या नेत्याची फूस होती. उद्धव ठाकरे यांनीही मला या प्रकरणामध्ये मदत केली होती. आदित्या ठाकरे यांच्याबद्दल मी माहिती मागितली त्यामुळे माझ्यावर हे पुन्हा आरोप करण्यात येत आहेत. गेले वर्षभर मी प्रकरणाचा छडा लावतोय.

साकिनाका पोलिसांकडून आरोप करणाऱ्या महिलेचा तपास सुरु आहे. दुबईची सर्व कागदपत्र माझ्याकडे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com