Raigad News: रायगड जिल्ह्यातील धरणांमधील पाणीपातळी खालावली, पंधरा दिवसांत ३.६८ टक्क्यांनी घट
Raigad Dam Water Level: रायगड जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात घट होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे आगामी काळातील पाणी उपलब्धतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
अलिबाग : जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील २८ धरणे तुडुंब भरली होती मात्र, सप्टेंबरपासून पावसाने दडी मारल्याने आता धरणांतील जलसाठा झपाट्याने घटू लागला आहे.