

Raigad Dam Water Level
ESakal
महाड : पावसाने दडी मारल्याने राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशात, रायगड जिल्ह्यातील धरणांमध्ये मात्र समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे. रायगड पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील २८ धरणांपैकी २६ धरणांमध्ये मुबलक पाणी असून, त्यातील १३ धरणे ९० टक्क्यांहून अधिक भरली आहेत.