
पाली : मे महिन्यापासून रायगड जिल्ह्यात पावसाने सुरुवात केली. सतत कोसळणारा अवकाळी पाऊस व त्यानंतर दाखल झालेला मान्सून यामुळे जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली आहेत. रायगड जिल्ह्यातील धरणांमध्ये आजमितीस 95 टक्के जलसाठा आहे. त्यामुळे धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पर्यटक पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गर्दी करत आहेत. सर्वत्र जलसाठा मुबलक आहे. धरणे, नद्या, तलाव व विहिरी आता पाण्याने ओसंडून वाहत आहेत. लघु पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील 13 तालुक्यातील 28 धरणांमध्ये सध्या तब्बल 95.25 टक्के जलसाठा आहे.