

Raigad Fort Ammunition Warehouse basement Discovered
ESakal
महाड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडाच्या ऐतिहासिक वैभवात आणखी एका महत्त्वपूर्ण वास्तूची भर पडली आहे. रायगडाच्या दक्षिणेकडे असलेल्या शिवकालीन दारूगोळा कोठाराच्या संवर्धनाचे काम सुरू असताना या वास्तूचे तळघर उजेडात आले आहे. विशेष म्हणजे, या कामादरम्यान अस्सल शिवकालीन फरसबंदीही आढळून आली आहे.