जिथे भूस्खलनाची शक्यता असेल तिथून लोकांना आधीच स्थलांतरित करा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भूस्खलनाची शक्यता असेल तिथून लोकांना आधीच स्थलांतरित करा!

भूस्खलनाची शक्यता असेल तिथून लोकांना आधीच स्थलांतरित करा!

Raigad Landslide at Talai Village: रस्ते, पूलांचे नुकसान झाल्याने बचावकार्यात अडथळा- मुख्यमंत्री

Raigad Landslide at Talai Village रायगड: महाराष्ट्रात पावसाने गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे राज्यातील रायगड जिल्ह्यात हाहा:कार माजला असून तळई गावांत तब्बल ३६ जणांचा बळी गेल्याची घटना घडली आहे. रायगडच्या महाडमध्ये आणि कोकणच्या चिपळूणमध्ये पूराची स्थिती उद्भवल्याने अनेक जण आपापल्या घरात अडकले आहेत. अनेक ठिकाणी घरं पाण्याखाली गेली आहेत. तशातच रायगडच्या तळई गावात भूस्खलन झाल्याने तब्बल ३५ हून अधिक लोकांचा बळी गेल्याची दुर्घटना घडली आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली. (Raigad Landslide at Talai CM Uddhav orders relocation of people who are living in areas where there is a possibility of landslide)

हेही वाचा: मुंबई: गोवंडी इमारत दुर्घटनेत चौथा मृत्यू; 7 जणांवर उपचार सुरू

"रायगडच्या तळई गावामध्ये झालेल्या भूस्खलनात सुमारे ३५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेक ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. पुरात आणि भूस्खलनामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, इतर काही ठिकाणी भूस्खलनाची शक्यता असल्यास तेथील रहिवाशांना वेळीच स्थलांतरित करावे असेही निर्देश दिले आहेत. चिपळूणमधील पूरपरिस्थिती बिकट आहे. रस्तेवाहतूक विस्कळीत झाली आहे. रस्ते आणि पूल यांचे नुकसान झाल्यामुळे NDRF आणि इतर बचाव पथकांना पूराच्या ठिकाणी पोहोचण्यास अडथळा येत आहे", अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

हेही वाचा: "मुख्यमंत्री महोदय, तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्याची आता खरी गरज"

तळईतील परिस्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही ट्वीट केले. "महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळल्याने जी दुर्घटना घडली आहे ती अत्यंत दु:खद आहेत. या संदर्भात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि NDRF चे व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी संवाद साधला आहे. NDRF चे पथक मदत आणि बचावकार्य करत आहे. केंद्र सरकार लोकांचे प्राण वाचवण्यासाठी शक्य ती मदत करत आहे, असे ट्वीट करत त्यांनी रायगडच्या पूरपरिस्थितीची दखल घेतली आणि महत्त्वाची माहिती दिली.

Web Title: Raigad Landslide At Talai Cm Uddhav Orders Relocation Of People Who Are Living In Areas Where There Is A Possibility Of Landslide Vjb

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..