

14th-Century Inscription found in Nandgaon
ESakal
मुरूड : मुरूड तालुक्यातील नांदगाव येथे चौदाव्या शतकातील राजा हंबीरराव यांच्या काळातील एक दुर्मिळ शिलालेख सापडल्याने इतिहास संशोधन क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली आहे. भवानी पाखाडी परिसरातील जनार्दन चोरघे यांच्या नारळ-सुपारीच्या वाडीत हा शिलालेख आढळून आला असून, त्याचे वाचन इतिहास अभ्यासक अनिकेत अशोक पाटील यांनी केले आहे.