
पाली : अष्टविनायकांपैकी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व तालुक्याचे ठिकाण असणाऱ्या पाली शहरामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व आयुष्य व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष अंकुश आपटे व त्यांचे सहकारी यांनी सोमवारी (ता. 28) पालीत अनोखे आंदोलन केले. हातात फलक घेऊन रस्त्यावर व नाक्यावर उभे राहून भर पावसात मूक आंदोलन केले. तसेच नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या संदर्भात मागणीचे निवेदन दिले.