
पाली : पाली खोपोली राज्य महामार्गावर अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहराजवळ मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका आहे. मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे अखेर नागरिकांनी याकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (ता. 7) अनोखे आंदोलन केले. रस्त्याजवळ खड्ड्याच्या इथे उभे राहून हातामध्ये विविध वाक्य लिहिलेले फलक या नागरिकांनी दर्शवले व शासनाचा निषेध केला.