
पाली : सुधागड तालुक्यात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे नागरिक व व्यावसायिक हैराण झाले आहे. त्यातच दरोडे व चोरीच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे विजपुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी सुधागड तालुका मनसेने केली आहे. याबाबतचे निवेदन बुधवारी (ता. 6) पाली वीज वितरण कार्यालयाला तालुका अध्यक्ष सुनील साठे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.