कर्जत : नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक सध्या गंभीर पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णतः बंद असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकावे लागत आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या अकार्यक्षमता, नियोजनशून्यता आणि वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडिततेमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.