
पाली : पाली खोपोली राज्य महामार्गावर बुधवारी (ता. 23) दुपारी तिवरे गावच्या हद्दीत दोन कार एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात एका कारमधील चालक गंभीररीत्या जखमी झाला असून दोन्ही कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. यातील एका कारमध्ये मद्याच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे यातील प्रवासी गटारी साजरी करण्यासाठी जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.