Raigad Dam: रायगड जिल्ह्यातील २१ धरणं तुडुंब! उपयुक्त जलसाठा ९०.६१ टक्क्यांवर, पाणीटंचाईच्या झळा दूर

Dam Water Level: रायगड जिल्ह्यातील २१ धरणं तुडुंब भरली असून, जिल्ह्यातील एकूण उपयुक्त जलसाठा ९०.६१ टक्क्यांवर पोहोचला आहे.
Raigad Dam Water Level

Raigad Dam Water Level

ESakal

Updated on

अलिबाग : जिल्ह्यात यंदाच्या पावसाने अक्षरशः जलक्रांती घडवून आणली आहे. आतापर्यंत पडलेल्या पावसामुळे लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील २८ धरणांपैकी तब्बल २१ धरणे तुडुंब भरली असून, जिल्ह्यातील एकूण उपयुक्त जलसाठा ९०.६१ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा सहन करणाऱ्या अनेक गावांसाठी ही अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची घडामोड ठरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com