निधीअभावी रायगड जिल्ह्याच्या विकासाला खीळ

९० कोटी रुपयांसाठी जिल्हा परिषदेचे राज्य सरकारला साकडे
Raigad Zilha parishad
Raigad Zilha parishadsakal media

अलिबाग : रायगड जिल्हा परिषद (Raigad Zilha Parishad) दळणवळण मजबूत करण्यासाठी (communication system) प्रयत्न करीत आहे. त्यानुसार सुमारे आठ कोटी २० लाखांची तरतूद करण्यात आली असली तरी सरकारकडून (Government) हा निधी मिळाला नसल्याने या कामांत अडथळा निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद व्यायामशाळा (ZP Gym), सभामंडप, रस्ते आदी बांधण्यासाठी निधीची तरदूद (Funding For developments) करते. यंदा सुमारे आठ कोटी २० लाख रुपयांची तरतूद केली आहे. मात्र या विकासकामांसाठी सरकारकडून अद्याप निधीच उपलब्ध झाला नाही. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील विकासकामांवर (Impact on rural developments) होऊ लागला आहे.

Raigad Zilha parishad
'ओमिक्रॉन व्हेरियंट'चा नवी मुंबईला धोका

याबाबत जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती नीलिमा पाटील यांनी सांगितले की, रायगड जिल्हा परिषदेच्या विकासकामांसाठी सरकारकडून निधी मिळाला नाही. तब्बल ९० कोटींचा मागील निधीची अपेक्षा आहे. याबाबत सरकारला कळविण्यात आले आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन रायगड जिल्हा परिषदेला निधी देण्याबाबत पाठपुरावा करण्यात येणार आहे.

"रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे; परंतु सरकारकडून निधी उपलब्ध न झाल्याने व्यायाम शाळा, सभामंडप व इतर नवीन कामे करता येत नाहीत. निधी मिळाल्यास या कामांना गती येईल."

- के. वाय. बारदेस्कर, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, रायगड जिल्हा परिषद.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com