महाराष्ट्र बातम्या
Railway: मध्य रेल्वेच्या 'या' मार्गावर धावणार ६२ विशेष गाड्या, प्रवाशांची होणार सोय
Latest Maharashtra News: मुंबईतून उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
Latest Mumbai News: रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर, तसेच पनवेल ते छपरादरम्यान ६२ विशेष ट्रेन चालविण्यात येणार आहे. यामुळे मुंबईतून उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०५३२६ एलटीटी-गोरखपूर २६ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत गुरुवारी आणि शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६ वाजता पोहोचेल.