
Maharashtra Politics: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. हिंदूंना भयभीत करुन त्यांची मते घ्यायची आणि नंतर निवडून आले की त्यांचीच मंदिरे पाडायची हे कसले हिंदूत्व. बांग्लादेशात हिंदूवर अत्याचार होत आहेत. ज्याप्रमाणे विश्वगुरु पंतप्रधान मोदींनी एका काॅलवर युक्रेनचे युद्ध थांबवले तसे ते बांग्लादेशातील हिंसाचार थांबवतील का? असा खोचक टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.