Rainesakal
महाराष्ट्र बातम्या
Rain : राज्यात तुरळक ठिकाणी धो धो पाऊस
मध्य महाराष्ट्रातील दुष्काळी समजल्या जाणाऱ्या नाशिक, सोलापूर, नगर जिल्ह्यांत मागील तीन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे.
पुणे - गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात तुरळक ठिकाणी धो धो पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, विदर्भातील बुलडाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला.
मंगळवारी (ता. २०) सकाळी आठ वाजेपर्यंत बीडमधील पेंडगाव येथे सर्वाधिक ११२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. या पावसामुळे दुष्काळी भागातील पिकांना जीवदान मिळाले आहे.

