Weather Updates: मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, 50 किमी/तास वेगाने वाहणार वारे| Rain LIVE Updates Alert Sounded in Maharashtra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rain alert

Rain Updates : समुद्र किनाऱ्यावर जाण्यास बंदी, मुंबईतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

राज्यभरात सध्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे नद्या, नाल्यांना पूरही आला आहे. आता पुणे, कोल्हापूर, पालघर, नाशिक आणि रत्नागिरी या जिल्ह्यांनाही अलर्ट जारी करण्यात आला आहे. 14 जुलैपर्यंत या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

नाशिकच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. . मुसळधार पावसामुळे 7 नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेत नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

तसेच, गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. आजही आठ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाऊस आणि पुरामुळे गेल्या 24 तासात 63 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्याचबरोबर पावसामुळे बाधित झालेल्या १० हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

मुंबईत आज ऑरेंज अलर्ट, अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

मुंबईत आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 14 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे. मुंबईत काल रात्री अधूनमधून पाऊस पडत होता. मुंबईच्या पश्चिम उपनगर परिसरात गेल्या अर्ध्या तासापासून मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान अद्याप तरी पाणी माहिती समोर आलेली नाही.

गुजरातमध्ये पुढील पाच दिवसांसाठी अलर्ट जारी

दक्षिण आणि मध्य गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पावसाने झोडपले, काही नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आणि विविध सखल भागात पाणी साचले. कावेरी आणि अंबिका नद्या धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहेत. दक्षिण गुजरातमधील डांग, नवसारी आणि वलसाड जिल्ह्यात पुढील पाच दिवसांत मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मराठवाडा: 387 गावांना पुराचा वेढा, हिंगोली आणि नांदेडला सर्वाधिक फटका

मराठवाड्यात 8 ते 10 जुलैला झालेल्या जोरदार पावसानं 387 गावांना पुराचा वेढा पडला आहे. यात हिंगोलीतील 62, नांदेडमधील 310, बीडमधील 1, लातूरमधील 8, उस्मानाबादमधील 2 गावांचा समावेश आहे. या दोन दिवसात 160 मोठी, तर 30 लहान जनावरे दगावली आहेत. तर 52 हजार 149 हेक्टर खरिपाची पिके पाण्याखाली गेली आहेत. हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले असून, 10 हेक्टर शेतजमीन खरडून गेली आहे. 8 पुलांचे नुकसान झाले आहे. तर 5 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर बीडमध्ये 4 जण जखमी झाले आहेत.

पुणे: पुणे शहरातील नाना पेठ परिसरात काल रात्री उशिरा दुमजली इमारतीची भिंत कोसळल्याने २ जखमी तर २ जणांना वाचवण्यात आले.

मुंबईत येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला असून १४ जुलैपर्यंत ऑरेंज अॅलर्टही जाहीर करण्यात आला आहे.

दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली

संततधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील वाघाड धरण ओव्हर फ्लो झाले आहे. हातनोरे, निळवंडी, पाडे, वलखेड या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

मुंबईत येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला असून १४ जुलैपर्यंत ऑरेंज अॅलर्टही जाहीर करण्यात आला आहे यासोबतच 50 किमी/तास वेगाने वारे वाहणार असल्याची सूचनादेखील देण्यात आली आहे.

अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. सकाळपासून धरणातून 75 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तर अलमट्टी धरणात गेल्या 24 तासात एक लाख 4 हजार क्युसेक्स पाण्याची आवक झाली आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी वाढल्यानं कर्नाटककडून अलमट्टी धरणातून हा विसर्ग वाढवला आहे. याआधी 50 हजार क्युसेक्सचा विसर्ग होता सुरु होता.

धुळे: शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. साखरी माळमाथा परिसरात झालेल्या पावसामुळं अक्कलपाडा धरणात देखील जलसाठा वाढला आहे. अक्कलपाडा धरणातून तब्बल 13000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग 15 नदी पात्रात करण्यात आला असून यामुळे नदीतील पाणी पातळीत वाढ झाली आहे.

मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथे भरती-ओहोटी

सापुतारा घाटात दरड कोसळली, सुरत वरुन येणारी वाहतूक सुरगाणा मार्फत वळवली

नागपूर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोसदनी घाटात कोसळली दरड; एकेरी वाहतुक सुरु

पुणे: खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्यामुळे मुठा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी देखील वाहून आलेली आहे. पुण्यातील शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराजवळील मुठा नदीपात्रात मोठी जलपर्णी साचलेली पाहायला मिळत आहे.

गुजरात : मुसळधार पावसामुळे राजकोटमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

केरळमधील कन्नूरमध्ये मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेलेल्या रस्त्यावर अडकलेली जीप बाहेर काढण्याचा प्रयत्न स्थानिक करत आहेत.

Web Title: Rain Live Updates Alert Sounded In Maharashtra Karnataka Uttarakhand Heavy Rainfall Rains Warning

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..