Rain Update : उद्यापासून पावसाचा राज्यात जोर वाढण्याची शक्यता

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाले असून, पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
rain
rainesakal

पुणे - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाले असून, पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. गुरुवार (ता. १४) नंतर शहर आणि जिल्ह्यात हलक्या स्वरूपात पाऊस तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मागील आठवड्याच्या शेवटी सक्रिय झालेल्या मॉन्सूनमुळे संपूर्ण जिल्ह्यातच पावसाने हजेरी लावली होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे, अंशतः ढगाळ हवामान आणि उन्हाच्या चटक्यामुळे उकाड्यातही काही अंशी वाढ झाली आहे.

बुधवारी शहरात पावसाने उघडीप घेतली होती. तर जिल्ह्यातही सर्वसाधारण अशीच स्थिती पाहायला मिळाली. सरासरी कमाल तापमानही ३० अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते.

राज्यातील अंदाज -

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्र, दक्षिणेकडे कायम असलेला मॉन्सूनचा आस यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. गुरुवारी (ता. १४) पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा आहे. गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. उर्वरित विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेर, टिकमघर, दाल्टोनगंज, दिघा ते पश्‍चिम - मध्य बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे. आग्नेय मध्य प्रदेश परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण उत्तर प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com