Koyna Dam : महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' कोयना धरणातून दोन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जलाशयात होत आहे प्रतिसेकंद २४ हजार ५९४ क्युसेक पाण्याची आवक
Koyna Dam
Koyna Damesakal
Summary

गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे ७४ (२८४९) मिलिमीटर, नवजाला ११५ (४०८८) मिलिमीटर आणि महाबळेश्‍वरला (Mahabaleshwar) ९६ (३७८८) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पाटण : कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात सोमवारच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी आहे. सोमवारी पडलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात दोन टीएमसीने वाढ झाली असून, जलाशयाचा एकूण पाणीसाठा ७४.८१ टीएमसी झाला आहे.

जलाशयात प्रतिसेकंद २४ हजार ५९४ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे ७४ (२८४९) मिलिमीटर, नवजाला ११५ (४०८८) मिलिमीटर आणि महाबळेश्‍वरला (Mahabaleshwar) ९६ (३७८८) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजाच्या पावसाने आज चार हजार मिलिमीटर पावसाचा टप्पा पार पाडला आहे.

Koyna Dam
Kolhapur Rain Update : राधानगरी धरणाचे तीन दरवाजे पुन्हा खुले; पंचगंगेच्या पातळीत किती झालीये वाढ? 'इतके' बंधारे अजूनही पाण्याखाली

दरम्यान, सकाळी नऊ वाजता पायथा वीजगृहातील दुसरे जनित्र चालवून दोन हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात (Koyna River) करण्यास सुरुवात केली असून, कोयना नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Koyna Dam
राज्याला मोठा दिलासा! Koyna Dam क्षेत्रात पुन्हा धुवांधार; धरण 70 टक्के भरलं तर महाबळेश्वरला 98 मिलिमीटर पाऊस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com