
rain update
esakal
राज्यात यंदा पावसाने हाहाकार माजवला आहे. आज अनेक ठिकाणी पावसाची उघडीप आहे, पण विदर्भात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट, तर भंडारा, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील काही भागांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.