Rain Update : पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं दमदार कमबॅक; कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस, महाबळेश्वरला 88 मिलिमीटर पावसाची नोंद

जलाशयात प्रतिसेकंद सहा हजार ८१३ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.
Koyna Dam
Koyna Damesakal
Updated on
Summary

धरणाचा एकूण पाणीसाठा ८५.९६ टीएमसी झाला असून, पाणीपातळी २१४७.१० फूट झाली आहे.

पाटण : सलग दुसऱ्या दिवशी कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाचा (Rain Update) जोर कायम आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांत धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे ६३ मिलिमीटर, नवजाला ९२ मिलिमीटर आणि महाबळेश्वरला (Mahabaleshwar) ८८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

धरणाचा एकूण पाणीसाठा ८५.९६ टीएमसी झाला असून, पाणीपातळी २१४७.१० फूट झाली आहे. जलाशयात प्रतिसेकंद सहा हजार ८१३ क्युसेक पाण्याची आवक होत असून, पायथा वीजगृहातील एका जनित्राद्वारे एक हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात (Koyna River) करण्यात येत आहे.

Koyna Dam
Dam Update : पावसाचा खंड पडल्याने दुष्काळसदृश स्थिती! कोयनेसह 'या' प्रमुख धरणांतील सहा TMC पाणी घटलं; फटका बसण्याची शक्यता

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत आहे. सलग दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने संथगतीने पाणीसाठ्यात वाढ होते आहे. तालुक्याच्या पूर्व भागात रात्री दमदार पावसाच्या सरी पडत होत्या. सकाळी थोडी पावसाने उसंत घेतली होती.

Koyna Dam
Kolhapur NCP Sabha : उपमुख्यमंत्रिपदी विराजमानानंतर अजितदादा पहिल्यांदाच बालेकिल्‍ल्‍यात; कोण-कोण लागणार गळाला?

मात्र, पुन्हा दुपारी दमदार पावसाच्या सरी येऊ लागल्या. सलग दोन दिवस संततधार पडलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून २० टीएमसी पाण्याची गरज असून, कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सरासरी एक हजार मिलिमीटर पाऊस पडणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Koyna Dam low water level news
Satara and Sangli Face Water Crisis as Koyna Power Generation Set to Halt
Stormy Winds Turn Fatal at Koyna Reservoir; Boat Driver Loses Life in Mishap
Deputy CM Eknath Shinde reviewing water conservation efforts under the ‘Gal Mukt Dharan, Jal Yukt Shivar’ scheme.
Marathi News Esakal
www.esakal.com