लहानपणापासूनच आपण पाहत आलेलो इंद्रधनुष्य फक्त पावसाळ्यातच का दिसतो? हे तुम्हाला माहिती आहे का....

Rainbow
Rainbow

सध्या सर्वत्र पाऊस पडत आहे. त्यामुळे सगळीकडे हिरवळ दिसत आहे. यातून निसर्गाची विविध रुपंही आपल्याला पहावयास मिळतात. अनेकदा ऊन पावसाचा खेळ आपण अनुभवतो. त्यातच डोंगर रांगावरील हिरवळीवर सुर्याची सोनेरी किरणं तुम्ही कधी पाहिलेत का? निसर्गाचे हे अप्रतिम रुप अनुभवतानाच आकाशात अनेकदा अर्धवर्तुळाकार सप्तरंगी पट्ट्याचा इंद्रधनुष्यही तुम्ही पाहिल असेल ना? शब्दात वर्णन न करता येणाऱ्या या दृश्‍यावर अनेकांनी कविता केल्या आहेत. अनेकांनी आपापल्या पद्धतीने मांडण्याचाही प्रयत्न केला आहे. पण अनेकांना प्रश्‍न पडतो तो म्हणजे इंद्रधनुष्याला सात रंगच का? हे अर्थवर्तुळाकाराच का? असे एकना अनेक कारणं आहेत.

वैज्ञानिक आयझॅक न्यूटन यांनी इंद्रधनुष्य कसे तयार होते हे स्पष्ट केले आहे. सूर्यप्रकाश इंद्रधनुष्याच्या रंगांनी बनलेला आहे. जेव्हा हे सर्व रंग एकत्र मिसळले जातात. तेव्हा तो पांढरा दिसतो. पांढरा प्रकाश म्हणजे आपण प्रत्येक दिवशी पाहात असलेला प्रकाश आहे. जेव्हा, सूर्यप्रकाश एकाच दिशेने हवेच्या माध्यमातून प्रवास करतो, तेव्हा आपण पांढरा प्रकाश पाहतो. जेव्हा सूर्यप्रकाश एका पावसाच्या थेंबाच्या माध्यमातून प्रवेश करतो, तेव्हा पहिल्यांदा प्रकाशाचे त्या थेंबात वक्रीभवन होते. त्यानंतर, पावसाच्या थेंबामध्ये त्याचे संपूर्ण अंतर्गत प्रतिबिंब होते, याबद्दल खूप माहिती उपलब्ध आहे. 

सोलापुरातील दयानंद महाविद्यातील भौतिकशास्त्र तज्ञ डॉ. रमेश मुळीक म्हणाले, इंद्रधनुष्याचा मजेदार खेळ असतो. सूर्यकिरण अनेक रंगाचे असतात. जेव्हा पाण्याच्या थेंबात तुषारात किरण शिरतात. तेव्हा वक्रीभवनाची क्रिया होते. जांभळा तांबड्यापेक्षा जास्त वक्र होतो. काही थेंबात प्रकाश जातो, तेव्हा तो वेगळ्या रंगात येतो. वेगळे रंग धारण करतात. यावेळी पावसाचे थेंब मात्र टपोरे दिसत नसतात. सृष्टीमध्ये अशा अनेक घटना गोष्टी घडत असतात. त्यामागे काही एक कार्यकारणभाव असतो. त्या कार्यकारणभावाचा शोध हा आपल्यला शस्त्राकडे नेतो. घटना कशी घडली हे समाजशास्त्र सांगेल. त्याची तर्कसंगती शोधशास्त्र असेल परंतु घटना घडते. सृष्टीत असे बदल का होतात हा शोध भौतिकशास्त्र घेत असते.

पावसाचं येणं व इंद्रधनुष्य तयार होणं हे एक त्यांच्यातील गूढ नातं आहे. पावसाळा सुरु झाला की, चार महिन्याच्या उन्हाळाने भाजून निघालेल्या शरीराला हर्षोल्हास होतो. मृगनक्षत्राची सर आली की, धरणी आपल्या कुपीतील अत्तर अलगदपणे अवकाशात उधळून सोडते. तो मृदगंध घेता घेता छत्री फुलून येते. एवढ्यासाठीच उन्हाळ्यात होरपळून निघायच, असं वाटू लागतं. पूर्ण सृष्टी उमलू लागते. सप्तरंगांचा इंद्रधनुष्य दिसला की आपल्या आनंदाला पारावर राहत नाही. हा इंद्रधनुष्याचा सप्तरंग गोफ आपण करायचा म्हटलं तरी किती आटापिटा करावा लागेल? हो ना... इंद्रधनुष्याला त्याच्या आकारामुळे त्याचे हे नाव मिळाले, असे मानले जाते. इंद्रधनुष्याची कमान धनुष्यासारखी दिसते. ही रंगीत कमान फक्त पाऊस येतो, तेव्हाच तयार होते.

निसर्गसखी विद्या भगरे भोसले म्हणाले की, हिरवाईने नटलेला निसर्ग सप्तरंगच्या उधळणीत स्वप्न उद्याचे डोळ्यात साठवून ठेवणारा हा इंद्रधनू आहे. धरती व स्वर्गमधील अंतर कमी करणारा हा इंद्रधनुष्याच्या आकारामुळे त्याचे नाव इंद्रधनुष्य पडले. इंग्रजीत रेन बो असे म्हणले जाते. प्रत्येक पाऊस थेंब स्वत:चे इंद्रधनुष्य तयार करते.असे लाखो थेंब मिळून आकाशात इंद्रधनुष्य तयार होते. कोसळत्या धबधब्याच्या तुषांरातही किरण मिसळले की इंद्रधनुष्य दिसते.रस्यावर साठलेल्या पाण्यात पेट्रोलच्या थेंबातून गोलाकार सात रंग दिसतात. इंद्रधनूचां गोफ आपण श्रावणात पाहतो. सर्वांना तो हवाहवासा वाटतो. पाऊस असेल तर हे शक्य आहे. पाऊस हव तर झाडे लावा झाडे जगवा हा मंत्र जोपासना करण्यासाठी आपण सगळे प्रयत्नशील राहूया.

इंद्रधनुष्य अर्धवर्तुळाकार का दिसतो .... 

इंद्रधनुष्य अर्धवर्तुळाकार दिव्यांनी जाळून निघालेल्या असतो. हा प्रकाश आणि रंग यांचा मनोद्य खेळ सूर्य आणि आपण जमिनीवरून पाहणाऱ्यामध्ये असतो. सूर्यप्रकाशाच्या किरणांचा खेळ असतो. वक्रीभवनातून ते विकीरणातून प्रकाशकिरण दिसणाऱ्या इंद्रधनुष्यात त्याच वेळेला प्रकाशकिरण वेगवेगळ्या स्थितीमध्ये असतात. काही किरण वेगळे होऊन रंगात येतात. तर काही थेंबात परावर्तित होतात. 

कधी कधी दुहेरी इंद्रधनुष्य दिसतो .... 

कधी कधी दुहेरी इंद्रधनुष्य दिसतो, तेव्हा प्रकाशकिरण आतून दोनदा परावर्तित होतात. म्हणून यात आपल्याला सप्तरंग दिसतात. जांभळा, तांबडा, नारंगी, पांढरा, निळा, पिवळा आणि रंग दृश्यमान होतात. म्हणून आपण गंमतीने (जातानाही पाणी पी) असे म्हणतो.  हे रंग त्यांच्या तरंगलांबीवरून दिसतात.

कधीकधी गोलाकार इंद्रधनुष्य हि दिसते... 

संपूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य हि दिसते. त्यास इंद्रवज्र असे म्हणतात. हे इंद्रवज्र भौगोलिक ठिकाणी दिसते. गिर्यारोहकांस किंवा अती उंच ठिकाणाहून दिसते.

जशी हवा आणि प्रकाश असेल तेव्हा त्यापद्धतीने दिसतो इंद्रधनुष्य... 

जेव्हा जेव्हा हलकीशी सर असेल, हलकीशी हवा असेल आणि प्रकाश असेल तेव्हा तेव्हा आपल्यला अक्षावर इंद्रधनुष्य दिसतो. सकाळी आकाशात पश्चिमेकडे हा धनुष्य दिसतो तर सायंकाळी पूर्वकड़े हा इंद्रधनुष्य दिसतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com