
पंढरपूर : लग्नासाठी थाटलेला मांडव.... खास नवरा-नवरीसाठी सजवलेला भोवला आणि सजलेल्या लग्न मंडपातील सनई चौघड्याचे मंगल स्वर... अशा प्रसन्न आणि उत्साही वातावरणामध्ये रविवारी (ता. २) दुपारी १२ वाजता राज सुकुमार मदनाचा पुतळा अशा साक्षात श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात व भक्तिमय वातावरणात पार पडला. देवाच्या विवाह सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो भाविक पंढरपुरात आले होते. भाविकांच्या गर्दीने मंदिर व परिसर अक्षरशः तुडुंब भरून गेला होता.