
अमित ठाकरेंना मंत्रीपद मिळणार? राज ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण
राजकीय सत्तान्याट्यनांतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. त्यानंतर आता मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशातच महराष्ट्र नवं निर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता राजकीय पटलावर वर्तवण्यात येत आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.(raj thackeray amit thackeray cabinet eknath shinde devendra fadanvis maharashtra politics )
हेही वाचा: आदित्य ठाकरेंना शह; 'राज पुत्र' अमित यांना शिंदेंच्या मंत्रिमंडळात स्थान ?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपाकडून अमित ठाकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची ऑफर देण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र राज ठाकरेंनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. (Raj Thackeray News)
एका वृत्त वाहिनीशी बोलताना राज ठाकरे यांनी या वृत्ताच खंडन केलं. अमित ठाकरेंच्या मंत्रीपदाचे वृत्त हे खोटे असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा: शिवसेनेच्या फुटीमागे शरद पवार; केसरकर यांचा आरोप
अमित ठाकरेंना कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाणार असल्याचं वृत्ताला राज ठाकरेंनी दुजोरा दिलेला नाही. ही बातमी खोटी असून, कोणीतरी केलेला खोडसाळपणा असल्याचं म्हटले आहे. (Amit Thackeray News)
ही वृत्त धाधंत खोटे आहे. कोणी तरी मुद्गामहून राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण करण्यासाठी हे वृत्त पसरवत आहे. राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या नावाचा वापर करुन राज्यात वेगळ वातावरण निर्णाण करण्यात पयत्न सुरू असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच, अमित ठाकरेंनी मंत्रीपद मिळणार नाही असेदेखील राज ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले.
Web Title: Raj Thackeray Amit Thackeray Cabinet Eknath Shinde Devendra Fadanvis Maharashtra Politics
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..